राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनात सहभागी व्हा : संघचालक विनोद बन्सल
Updated On:

पिंपरी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी निमित्त मंगळवारी(दि.24) पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल 25 स्थानाहून विविध भागातील नियोजित मार्गावर संघ गणवेशातील स्वयंसेवकांचे सदंड पथसंचलन निघणार आहेत. घोषाच्या तालावर हे संचलन होणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी केले आहे.
देहू, देहूरोड, निगडी, संभाजीनगर, चिखली, दिघी, मोशी, आळंदी,चऱ्होली, भोसरी, इंद्रायणीनगर, संत तुकारामनगर, कासारवाडी, सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, काळेवाडी, पिंपरी, चिंचवड पूर्व, चिंचवड पश्चिम, वाकड / थेरगाव, हिंजवडी, पुनावळे, रावेत, आकुर्डी याठिकाणी सकाळच्या वेळेत हे संचलन होणार आहे.





