Hera Pheri 3. परेश रावल यांच्या एक्सिटवर जॅानी लीव्हरने दिली प्रतिक्रिया; म्हणाला मजा नही आएगा…!

Actor Johnny Lever : हेरा फेरी ३ या बहुचर्चित चित्रपटातून ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी एक्सिट घेतल्यानंतर चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. यानंतर बॉलिवूडमधील लोकप्रिय विनोदी अभिनेता जॅानी लीव्हरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. परेश रावल यांच्याशिवाय ‘हेरा फेरी’ सारख्या चित्रपटाचा आनंद पूर्ण होणार नाही. त्यांनी ही भूमिका नक्कीच साकारावी, असे म्हटले आहे.
हेरा फेरी चित्रपटांच्या आधीच्या दोन भागात बाबूराव गणपतराव आपटे हे पात्र अभिनेते परेश रावल यांनी साकारले होते. या पात्राने परेश रावल यांना खूप मोठी प्रसिद्ध मिळाली. या पात्राने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. यामुळे या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात अभिनेते परेश रावल नसणे म्हणजेच चित्रपट अपूर्ण असल्याचे बोलले जात आहे. जर परेश रावल या चित्रपटात नसतील तर त्याला या चित्रपटात पूर्वीसारखी मजा राहणार नाही. बाबूरावच्या पात्राशिवाय हा चित्रपट अपूर्ण वाटेल, अशी स्पष्ट प्रतिक्रिया देखील जॅानी लीव्हर याने दिली आहे.
या चित्रपटात अनेकांची नावे बातम्यांमध्ये समोर येत आहेत. अभिनेता कार्तिक आर्यन याची हेरा फेरी ३ मध्ये एन्ट्री झाली आहे. त्याच्यासाठी एक वेगळी भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. तर अभिनेते पंकज त्रिपाठी यांना देखील या चित्रपटासाटी कास्ट केले जाऊ शकते, अशा चर्चा आहेत, पण तशी अधिकृत माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही.
हेरा फेरी ३ मध्ये मूळ कलाकार अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल असणार आहे. पण परेश रावल यांच्या एक्सिटनंतर त्यांचे पात्र कोणाच्या वाट्याला येणार याबाबत कोणताही अधिकृत खुलासा चित्रपटाच्या मेकर्सकडून करण्यात आलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार हेरा फेरी ३ च्या शूटिंगला ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुरूवात होण्याची शक्यता आहे.




