जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघचा ‘वेदा’ चित्रपट आता ओटीटीवर पाहता येणार

Veda On OTT | अभिनेता जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ यांचा ‘वेदा’ चित्रपट आता ओटीटीवर येण्यास सज्ज होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जादू फिकी पडल्यानंतर आता ओटीटीवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘वेदा’ सिनेमा हा खऱ्या घटनांवर आधारीत आहे. प्रदर्शनाच्या जवळपास २ महिन्यांनी हा सिनेमा ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. थिएटरमध्ये ‘वेदा’ सिनेमा पाहता न आलेल्या प्रेक्षकांना आता घरबसल्या ‘वेदा’ सिनेमा पाहता येणार आहे. झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘वेदा’ सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे.
हा सिनेमा गुरुवारी म्हणजेच १० ऑक्टोबरला ओटीटीवर प्रदर्शित होईल. जॉन अब्राहम आणि शर्वरीशिवाय या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी आणि तमन्ना भाटिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Witness the grit, the power and the unwavering spirit of @sharvari as she transforms into #Vedaa!
Book your tickets- https://t.co/eglrRd0pPq at #PVRINOX now 🇮🇳@TheJohnAbraham #nowitsabhi @tamannaahspeaks #nikkhiladvani #onlyemmay #madhubhojwani @ZeeMusicCompany pic.twitter.com/TjrgazzuPE
— INOX Movies (@INOXMovies) August 23, 2024
‘वेदा’च्या निमित्ताने शर्वरी-जॉन यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले. या दोघांशिवाय अभिषेक बॅनर्जी सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत आहे. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी या सिनेमात विशेष भूमिकेत पाहायला मिळत आहेत.
‘वेदा’ सिनेमाचं दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केले आहे. हा सिनेमा १५ ऑगस्ट २०२४ ला सिनेमागृहात रिलीज झाला होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५० कोटींहून अधिकची कमाई केली होती. विशेष म्हणजे जॉन अब्राहम दीड वर्षांनी ‘वेदा’च्या माध्यमातून पडद्यावर परतला.





