मादाम तुसॉं संग्रहालयात करण जोहरचा मेणाचा पुतळा

सिंगापूरच्या मादाम तुसॉं संग्रहालयात बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. खुद्द करण जोहरच्या हस्ते या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
करण जोहर बॉलिवूडमधील पहिला दिग्दर्शक आहे ज्याचा सिंगापूरच्या मादाम तुसॉं संग्रहालयात मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याच्या अनावरणासाठी करणची आई देखील उपस्थित होती. करणने पुतळ्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

काळ्या रंगाचा कोट आणि सेल्फी घेतानाच्या पोजमध्ये करणचा हा पुतळा आहे. यापूर्वी मता तुसॉंच्या संग्रहालयामध्ये डझनभर बॉलिवूड सेलिब्रिटी आणि खेळाडूंचे मेणाचे पुतळे उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये अमिताभ बच्चन, ऐश्‍वर्या, शाहरुख खान, सानिया मिर्झा, अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण, सचिन तेंडूलकर यांच्याही पुतळ्यांचा समावेश आहे. आता पहिल्यांदाच एका चित्रपट निर्माता दिग्दर्शकाच्या पुतळ्याची भर या संग्रहालयामध्ये पडली आहे. करण जोहरने आपल्या ट्विटर अकाउंटवरून या पुतळ्याचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये आपण कोण आणि पुतळा कोणता हे ओळखून दाखवा असे मजेशीर आव्हानही त्याने फॅन्सला दिले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.