Jiya Shankar | ‘बिग बॉस OTT २’ फेम अभिनेत्री जिया शंकर आणि लोकप्रिय युट्युबर अभिषेक मल्हान यांच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र जियाने सोशल मीडियावर ‘मिस्ट्री मॅन’ सोबतचा एक फोटो शेअर करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक आणि जिया एकमेंकाना डेट करत असून लवकरच साखरपूडा करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांवर आता जियानं थेट उत्तर दिले. जियाने तिच्या इंस्टाग्रामवर एक अत्यंत रोमँटिक फोटो पोस्ट केला. जियाने या फोटोसोबत कॅप्शन दिले की, “चला, २०२५ मध्ये या खोट्या अफवा सोडून देऊया.” यातून स्पष्ट झाले की अभिषेकसोबत साखरपुड्याच्या बातम्या केवळ अफवा होत्या. दरम्यान, जियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नसल्याने तो नेमका कोण आहे, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. दरम्यान, ‘वेड’ चित्रपटाशिवाय जिया व्हर्जिन भास्कर या वेब सीरिजमध्येही झळकली आहे. तसेच ती बिग बॉस ओटीटीवरही पाहायला मिळाली. बिग बॉसच्या घरात जिया शंकर आणि अभिषेक मल्हान यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. Jiya Shankar | हेही वाचा: ५३ उमेदवारांनी घेतली भेट, राज ठाकरेंचे मनसैनिकांना तीन महत्वाचे सल्ले; म्हणाले “मलाही खूप ऑफर…”