जितेंद्र आव्हाड यांचं मोठं वक्तव्य,‘पक्षविरहित बोलतोय, मी स्वतः एक साईबाबांचा मोठा भक्त’

मुंबई – बागेश्वर बाबा उर्फ पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये साईबाबांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. “साईबाबा हे देव नाहीत. साईबाबा संत आणि फकीर असू शकतात. पण देव असू शकत नाही. आपल्या धर्मात शंकराचार्यांना सर्वात मोठं स्थान आहे. त्यांनी साईबाबांना देवांचं स्थान दिलेलं नाही. कोल्ह्याची कातडी पांघरून कोणीही सिंह बनू शकतं नाही.” त्यांच्या या वादग्रस्त विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बागेश्वरने साईबाबांचा जाणून बुजून अपमान केला, अपशब्द वापरले. त्यामुळे असंख्य साईप्रेमी व्यथित झाले आहेत. साईबाबांना कोणी काय मानाव हे सांगणारा हा बागेश्वर कोण ? आणि महाराष्ट्रात असल्या येड्यांना कोण पुसतं. आपण सगळे भेटुयात गुरुवार दिनांक 6 एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता साईबाबा… pic.twitter.com/FJm2u0c9JD
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 3, 2023
माध्यमांशी बोलतांना जितेंद्र आव्हाड म्हणाले,’मी गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डीला जात असून स्वतः एक साईबाबांचा मोठा भक्त आहे. माझ्या घरातील देवघरात देखील साईबाबांची आणि श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे. त्यांची दररोज आमच्या पद्धतीने आम्ही पूजा करतो. मी घरातून बाहेर पडताना त्यांच्या चरणी मस्तक ठेवून हात जोडून घराबाहेर पडतो. मी त्यांना देव मानतो. हा बागेश्वर कोण सांगणार की त्यांना देव मानू नका”, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी सुनावल आहे.





