पिंपरी | जितेंद्र आव्हाडांचा भाजपाकडून निषेध

पिंपरी, (प्रतिनिधी) – आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्यावतीने गुरुवारी (दि. 30) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले.
या घटनेच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाडच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी खासदार अमर साबळे, दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, प्रदेश सदस्य माऊली थोरात, सरचिटणीस संजय मंगोडेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, शैला मोळक, अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष भीमा बोबडे,
महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, माजी महापौर आर. एस. कुमार, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभूवन, सागर आंघोळकर, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, अॅड.गोरक्षनाथ झोळ आदी सहभागी झाले होते.





