जितेंद्र आव्हाडांबद्दल शरद पवारांनी डाॅक्टरांना दिल्या होत्या ‘या’ महत्वाच्या सुचना!

मुंबई- राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती बाहेर जाऊ देऊ नका. ही माहिती आपल्यातच असायला हवी, अशा सुचना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी डाॅक्टरांना दिल्या होत्या. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या प्रकृतीबाबतची माहिती सगळ्यांपर्यंत क्षणाक्षणाला पोहचू शकली नाही.

जितेंद्र आव्हाडांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. माझ्या अतिशहाणपणामुळे मला कोरोनाला तोंड द्यावं लागलं. आता मला माझी सवय थोडी बदलायला हवी. लोकांमध्ये जाण्याची जी सवय होती मला त्याचेच परिणाम भोगावे लागत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मला कोरोना झाला हे मला माहित नव्हतं. मी आयसीयूमध्ये असताना माझ्यापुढे जे जेवणाचं ताट आलं त्यावर कोरोना रुग्ण असं लिहीले होते. तेव्हा मला कोरोना झाल्याचं कळलं. मला कोरोना झाल्यापासून ते रुग्णलयात दाखल करण्यापर्यंत मला काही आठवत नाही आहे, असंही ते म्हणाले

या काळात काळजी घेणं गरजेचं आहे. मी ती घेतली नाही. 80 हजार जणांमध्ये जाऊन खाण्याचं वाटप केलं. प्रकृतीचा विचार केला नाही. कुटुंबाचाही विचार केला नाही.  रुग्णालयात दाखल केल्यानंतर परिस्थिती बिकट होत गेली त्यानंतर मला फोर्टीज रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. सगळे घाबरले होते. मी माझ्या मुलीचंही ऐकलं नाही त्यामुळे मला हे दिवस बघावे लागले, अशी माहिती त्यांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.