Jitan Ram Manjhi : लालूंनीच मला मुख्यमंत्रीपदावरुन हटवले; जितन राम मांझी व्यक्त केली मनातली खदखद

पाटणा : राजद नेते लालूप्रसाद यादव यांनी स्वतः नोटीस देऊन मला मुख्यमंत्रीपदावरून काढून टाकण्याचे काम केले आहे. तेजस्वी आणि तेजप्रताप, मीसा यांचे काय योगदान होते की, त्यांना निवडणूक लढवण्यास भाग पाडले गेले. राबडी देवी यांनाही मुख्यमंत्री बनवण्यात आले. त्यांचे काय योगदान होते, असा तीक्षण सवाल केंद्रीय मंत्री जितन राम मांझी यांनी केला आहे. मांझी यांचे जावई देवेंद्र मांझी यांची बिहार राज्य अनुसूचित जाती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवरून सध्या खूप वाद सुरू आहे.
लालू प्रसाद यादव यांनी बिहारमधील राजकारणार जोरदार हल्लाबोल केला आहे. एका वाहिनीच्या मुलाखतेत मांझी यांनी सांगितले की, लाल्प्प्प्रसाद यादव यांनी कधीही आंबेडकर वाद जोपासला नाही. लालूंनी आंबेडकरांसोबत जे केले त्याचे मला आश्चर्य वाटत नाही. लालू यादव यांनी फक्त त्यांच्या कुटुंबाला पुढे ठेवले आहे. आयोगाने योग्य काम केले आहे.
मांझी म्हणाले की, माझा मुलगा युनिसेफचा समन्वयक होता. नंतर तो एमएलसी झाला आणि माझा जावई मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्यांच्या गुणवत्तेबद्दल न बोललेलेच बरे. पण लालूंकडे किंवा त्यांच्या वारसांपुढे अशी काय गुणवत्ता होती, की त्यांना राजकारणातली सगळी वाट सोपी वाटावी.
मांझी यांना विचारण्यात आले की, त्यांचा पक्ष किती जागा लढवेल? यावर मांई म्हणाले की, २०२० मध्ये माझ्या पक्षाला सात जागा मिळाल्या ज्यापैकी आम्ही ४ जिंकल्या. जर लोक स्ट्राइक रेटबद्दल बोलत असतील तर आमच्याकडेही चांगला स्ट्राईक रेट आहे. लोकसभा निवडणुकीत एका जागेवर निवडणूक लढवली आणि ती पण जिंकली. अशा परिस्थितीत त्यांचा स्ट्राइक रेट १०० टक्के आहे. मी इतर लोकांबद्दल बोलत नाही पण सन्माननीय आणि न्याय्य जागा दिल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे.





