“माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी मोदींसोबतच!” ; मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याच्या चर्चांना जीतन राम मांझींकडून पूर्णविराम

Jitan Ram Manjhi । बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी हे लवकरच केंद्रातील मोदी सरकारमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांवर आता खुद्द जीतन राम मांझी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याच्या अफवांवर यांनी मंगळवारी आपले मौन सोडत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे म्हटले.
जितन राम मांझी यांनी त्यांच्याविषयी सुरु असणाऱ्या चर्चांवर स्पष्टीकरण देण्यासाठी सोशल मिडीआयवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी, “काही वेब पोर्टल्स आणि न्यूज चॅनेल्सनी जीतन राम मांझी मंत्रिमंडळातून राजीनामा देणार असल्याच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचा प्रचार/प्रसार केला आहे, तर मुंगेर बैठकीला झालेल्या विलंबावर बोलताना आपण म्हणालो होतो कि, तुम्हाला उशीर होत आहे त्यामुळे माझी फ्लाईट चुकेल आणि मला कॅबिनेट सोडावी लागेल.” आता त्यांच्या याच वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी मोदींसोबतच Jitan Ram Manjhi ।
ते पुढे म्हणाले, “मी अशा लोकांना हे स्पष्ट करू इच्छितो की मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना कधीही सोडणार नाही. आपण सर्वजण देशाच्या आणि बिहारच्या हितासाठी काम करत आहोत पण काही मीडिया हाऊसेस विरोधी पक्षाच्या इशाऱ्यावर आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मी अशा लोकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देऊ इच्छितो, अन्यथा मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेन आणि प्रेस कौन्सिलमध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करेन.” असे म्हणत त्यांनी इशारा दिला आहे.
मंत्रिमंडळाबद्दल मांझी काय म्हणाले? Jitan Ram Manjhi ।
यापूर्वी, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी मंगळवारी मुंगेरमधील एका कार्यक्रमात मोदी सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यादरम्यान मांझी यांनी मंत्रिमंडळ सोडण्याची धमकीही दिली. त्यांनी म्हटले होते की एनडीएमध्ये त्यांच्या पक्षाला योग्य लक्ष दिले जात नाही. तथापि, यानंतर, पाटणा विमानतळावर माध्यमांशी बोलताना मांझी यांनी त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिले आणि सांगितले की त्यांना एनडीएबद्दल कोणताही राग नाही.” माध्यमांशी बोलताना जीतन राम मांझी म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला दिलेले मोठे पद ही छोटी गोष्ट नाही. दिल्ली निवडणुकीत मी पूर्णपणे एनडीएच्या बाजूने आहे.”





