Jio Recharge Plan: जिओ आणि हॉटस्टारचे जॉइंट व्हेंचर असलेला JioHotstar हा ओटीटी प्लॅटफॉर्म काही दिवसांपूर्वीच ग्राहकांसाठी उपलब्ध झाला आहे. आता या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राहकांना चित्रपट, वेब सीरिजसोबतच क्रिकेटचा आनंदही घेता येणार आहे. जिओहॉटस्टारवरच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएलचे लाइव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. तुम्हाला या स्पर्धा पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. JioHotstar च्या सबस्क्रिप्शन प्लॅनची किंमत 149 रुपयांपासून सुरू होते. मात्र, तुम्हाला हे सबस्क्रिप्शन मोफतही मिळू शकते. यासाठी जिओचा 949 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. जिओचा 949 रुपयाचां रिचार्ज प्लॅन जिओने ग्राहकांसाठी खास 949 रुपयांचा प्लॅन आणला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 149 रुपये किंमतीचे Jio Hotstar Mobile सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे. या प्लॅनची मुदत 84 दिवस आहे. प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवस दररोज 2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसचा फायदा मिळतो. याशिवाय, ग्राहकांना 90 दिवसांसाठी Jio Hotstar Mobile सब्सक्रिप्शन मोफत दिले जाते. अशाप्रकारे, ग्राहक मोफत मोबाइलवर आयपीएलचा आनंद घेऊ शकतात. Jio Hotstar सबस्क्रिप्शन प्लॅन Jio Hotstar ने 3 वेगवेगळे सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच केले आहेत. यात मोबाइल प्लॅन, सुपर प्लॅन आणि प्रीमियम प्लॅनचा समावेश आहे. सर्वात कमी किंमतीत येणाऱ्या प्लॅनची किंमत 149 रुपये आहे. तर सर्वाधिक किंमतीच्या प्लॅनची किंमत 1,499 रुपये आहे. यातील काही प्लॅन्समध्ये ग्राहकांना जाहिराती देखील दिसतील.