नवी दिल्ली – दोन लाखांचे इनाम असलेल्या जैश ए महंमदच्या एका दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी श्रीनगरमधून अटक केली आहे. फैयाज अहमद लोन असे या दहशतवाद्याचे नाव असून तो मुळचा कुपवाडा येथील रहिवासी आहे. तो सन 2015 पासून सुरक्षा दलांना चुकारा देत होता. त्याला पकडण्यासाठी सरकारने दोन लाख रूपयांचे इनाम घोषित केले होते.
तो अनेक गुन्ह्यांतील आरोपी असून त्याच्यावर घातपाताचे अनेक गुन्हे आणि खटले दाखल आहेत. त्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयाने विनाजामीन अटक वॉरंट जारी केले होते. पण या वॉरंटला न जुमानता तो सुरक्षा दलांना सातत्याने गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता. अखेर दिल्ली पोलिसांनी काश्मीरात जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या.