झाशीच्या मेडिकल कॉलेजच्या मुलांच्या वॉर्डात भीषण आग ; 10 अर्भकांचा मृत्यू तर 16 जण गंभीर जखमी

Jhansi Medical College Fire । उत्तर प्रदेशातील झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या मुलांच्या वॉर्डात शुक्रवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या लागलेल्या आगीत किमान 10 अर्भकांचा मृत्यू झाला तर 16 मुले गंभीररित्या भाजली गेली. झाशीचे जिल्हा दंडाधिकारी अविनाश कुमार यांनी, हॉस्पिटलच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात (NICU) रात्री 10.45 वाजता आग लागली, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
योगी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर Jhansi Medical College Fire ।
दरम्यान, झाशी मेडिकल कॉलेज आगीच्या घटनेवर योगी सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृत मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत सरकार करणार आहे.
घटनेचा पोलिसांकडून तपास सुरु Jhansi Medical College Fire ।
उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी झाशी मेडिकल कॉलेज गाठून घटनेची पाहणी केली. उपमुख्यमंत्री म्हणाले – “फेब्रुवारीमध्ये फायर सेफ्टी ऑडिट करण्यात आले होते. जूनमध्ये मॉक ड्रीलही घेण्यात आले होते. ही घटना कशी आणि का घडली, याबाबत तपास अहवाल आल्यानंतरच काही सांगता येईल. सात नवजात बालके. तीन जणांचे मृतदेह अद्याप ओळखल्या गेलेल्या नवजात बालकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाईल.
हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या झाशीचे विभागीय आयुक्त विमल दुबे यांनी पत्रकारांना सांगितले की, एनआयसीयूमध्ये सुमारे ३० मुले होती आणि त्यापैकी बहुतेकांना बाहेर काढण्यात आले आहे. झाशीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) सुधा सिंह यांनी शनिवारी सांगितले की, या अपघातात गंभीर भाजलेल्या १६ मुलांवर उपचार सुरू आहेत. या अपघाताच्या वेळी एनआयसीयूमध्ये ५० हून अधिक मुले दाखल होती.
झाशीजवळील महोबा जिल्ह्यातील एका दाम्पत्याने या अपघातात आपले नवजात मूल गमावले आहे. माझ्या मुलाचा आगीत मृत्यू झाला, असे रडत रडत 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता आपल्या मुलाचा जन्म झाल्याचे मुलाच्या आईने पत्रकारांना सांगितले.





