BJYM : जेजुरीत भाजयुमोचा ‘युवा निर्धार मेळावा’; युवकांच्या प्रश्नांवर होणार चर्चा
BJYM : भारतीय जनता युवा मोर्चा पुणे ग्रामीणच्या वतीने जेजुरीत ३ ऑक्टोबरला ‘युवा निर्धार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. युवकांच्या प्रश्नांवर चर्चा होणार.

BJYM : भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने शनिवारी (३ ऑक्टोबर) जेजुरी येथे ‘युवा निर्धार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ४.३० वाजता मार्तंड सभागृहात हा मेळावा होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील युवा कार्यकर्ते, पदाधिकारी आणि युवकांना संघटनात्मकदृष्ट्या एकत्र आणणे, तसेच युवकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करणे, हा मेळाव्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. शिक्षण, रोजगार, सामाजिक प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि आगामी संघटनात्मक कामकाज यावर यावेळी चर्चा होणार आहे.
मेळाव्यास खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर, दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार योगेश टिळेकर, संजय जगताप, पुणे ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, सरचिटणीस राजेश पांडे, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पुणे जिल्हा ग्रामीणमधील विविध तालुक्यांतील युवा मोर्चाचे पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष आणि कार्यकर्ते मेळाव्यास सहभागी होणार आहेत. युवकांनी सामाजिक कार्य, शिक्षण, रोजगार आणि जनहिताच्या विषयांत सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश मेळाव्यातून दिला जाणार असल्याची माहिती भाजयुमो जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी दिली.





