मणिपूरमध्ये भाजप-जेडीयू एकत्र राहणार; पक्ष प्रदेशाध्यक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर हायकमांडने तासाभरात फिरवला निर्णय

Manipur JDU-BJP: नितीश कुमार यांच्या पक्ष जेडीयूचे मणिपूर प्रदेशाध्यक्ष यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. तासाभरातच पक्षाच्या हायकमांडने त्यांचा निर्णय फिरवला आणि प्रदेशाध्यक्ष वीरेन सिंग यांनाही पदावरून हटवले आहे.
बुधवारी दुपारी साडेचार वाजता जेडीयू मणिपूरच्या अध्यक्षांनी पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली होती. थोड्याच वेळात जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद मीडियासमोर आले आणि त्यांनी पाठिंबा काढून घेण्याचे नाकारले. ते म्हणाले- ‘एनडीएला आमचा पाठिंबा कायम राहील.’ प्रसाद म्हणाले की, ‘मणिपूर युनिटने केंद्रीय नेतृत्वाशी न बोलता पत्र जारी केले होते. ही अनुशासनहीनता आहे. आम्ही मणिपूर सरकारसोबत राज्यातील जनतेची सेवा करत राहू.
#WATCH | Delhi: JD(U) national spokesperson Rajeev Ranjan Prasad says, “This is misleading and baseless. The party has taken cognisance of this and the president of Manipur unit of the party has been relieved of his position. We have supported NDA and our support to the NDA… https://t.co/PhAJwAp4xn pic.twitter.com/usvowgta3n
— ANI (@ANI) January 22, 2025
2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने 60 पैकी 32 जागा जिंकल्या होत्या. जेडीयूचे 6 आमदार विजयी झाले होते. यापैकी 5 आमदार भाजपसोबत गेले होते. तीन अपक्ष आमदारांचाही सरकारला पाठिंबा आहे.
याच वर्षी बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. केंद्रासोबतच भाजप आणि जेडीयू हेही बिहार सरकारमध्ये मित्रपक्ष आहेत.
काँग्रेसने म्हंटले- मणिपूरमधील सरकारने स्वतः राजीनामा द्यायला हवा होता
यावर काँग्रेसचे प्रवक्ते ज्ञान रंजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्ञान रंजन म्हणाले की, मणिपूरमधील परिस्थिती, तेथे ज्याप्रकारे अत्याचार झाले. तिथल्या सरकारने स्वतः राजीनामा द्यायला हवा होता. यानंतर तिथे राष्ट्रपती राजवट लागू व्हायला हवी होती. ते म्हणाले की, आजपर्यंत पंतप्रधान मोदींनी मणिपूरला भेट दिली नाही.
आरजेडीने म्हंटले- मणिपूरच्या आमदाराने धाडसी पाऊल उचलले –
जेडीयूने मणिपूरच्या भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे वृत्त समोर येताच, आरजेडी पक्षाचे प्रवक्ते एजाज अहमद म्हणाले होते की, ‘जेडीयू आमदाराने मणिपूरमधील सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेत भाजप आणि नरेंद्र मोदींबाबत अविश्वास व्यक्त केला आहे. अशी परिस्थिती संपूर्ण देशात निर्माण होणार आहे. भाजप ज्याप्रकारचे राजकारण करत आहे आणि ज्या हेतूने ते करत आहेत, त्याचे परिणाम नक्कीच समोर येणार होते. मणिपूरच्या आमदाराने धाडसी पाऊल उचलले आहे.




