पुणे जिल्हा | जेबीव्हीपीतील बालवारकऱ्यांचा रिंगण सोहळा

इंदापूर, (प्रतिनिधी) – महाराष्ट्राच्या संस्कृतीची,संतांची विद्यार्थ्यांना जाण व्हावी या उद्देशाने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन जेबिव्हीपी प्रशालेमध्ये करण्यात आले होते. छोटे बाल वारकरी, विठ्ठल रूखमाई, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, मीराबाई, संत तुकाराम महाराज, गोरा कुंभार, वारकरी पोशाखात येऊन संपूर्ण जेबीव्हीपी परिसर मंगलमय वातावरणामध्ये विठ्ठलमय झाला होता.
संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे यांच्या हस्ते आरती करून प्रशालेतील बालवारकऱ्यांनी अभंगाच्या, हरिनामाच्या गजरात टेकडीवरील विठुरायाच्या मंदिराकडे प्रस्थान केले. बालवारकऱ्यांनी टाळ घोषाच्या गजरात रिंगण सोहळा करून त्यामध्ये फुगडी खेळून वारीचा आनंद घेतला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, संस्थेच्या उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले, संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे, संस्थेचे प्रमुख सल्लागार प्रदीप गुरव, विद्या निकेतन कॉलेज अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार,
प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य सम्राट खेडकर, संस्थेचे विश्वस्थ हृशी दादा ढोले व सर्व प्रशालेचे सुपरवायझर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व बालवारकरी यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा नादमय, भक्तिमयपणे साजरा करण्यात आला.





