प्रभात वृत्तसेवा नागठाणे – सरसेनापती हंबीरराव बाजी मोहितेंच्या ऐतिहासिक तळबीड गावाला विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी केले.तळबीड (ता .कराड) येथील साडेतीन कोटीच्या विविध विकास कामाच्या भूमीपुजन प्रसंगी व अनेक कार्यकर्त्यांच्या भाजपमधील पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी उमेश मोहिते, मृणालिनी मोहिते ,संगीता मोहिते यांच्यासह तळबीड ग्रामपंचायत सदस्य प्रशांत यादव यांच्यासह, माजी पंचायत समिती सदस्य सुनील पाटील, ग्रामपंचायत केंजळमधील सर्व ग्रामस्थ, बेलवडे हवेलीतील पदाधिकारी यांनी भाजप प्रवेश केला. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, उत्तरचे आ. मनोज घोरपडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावस्कर, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, महेश जाधव, सागर शिवदास, योगीराज सरकाळे, उमेश मोहिते, तळबीड सरपंच मृणालिनी मोहिते, उपसरपंच संगीता मोहिते, राजेंद्र मोहिते उपस्थित होते .आ. अतुल भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्यातील सर्व आमदार महायुतीचे आहेत. आम्ही महायुती म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. तसेच उमेश मोहिते व सरपंच मृणालिनी मोहिते यांनी तळबीडसह संपूर्ण गणात अनेक सामाजिक कार्य केली आहेत .आ. मनोज घोरपडे म्हणाले, तळबीड हे ऐतिहासिक गाव असून गावातील विकास कामामुळे पर्यटनाची खूप मोठी संधी निर्माण होणार आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कोणतेही गाव विकासापासून वंचित राहणार नाही .कारण माझ्या आमदार फंडातील मी निधी देणारच परंतु त्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मतदार संघातील प्रत्येक गावाला विशेष निधी आणणार आहे. महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार असून संपूर्ण जिल्हा परिषद ही भाजप महायुतीची होणार आहे. कराड पंचायत समितीसह उत्तर मधील सर्वच्या सर्व सीट या महायुतीच्या निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.यावेळी तुकाराम नलावडे, महेश घार्गे, धनाजी पाटील, श्रीकांत पिसाळ, विकासअण्णा गायकवाड, जयवंत जाधव, शैलेश चव्हाण, चंद्रकांत जाधव, सुरेश तात्या पाटील, शहाजी मोहिते, दीपक खडंग रमेश मोहिते सुजय मोहिते विशाल मोहिते शशिकांत मोहिते रणजीत पाटील याच्यासह परिसरातील नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.