Jaykumar Gore – मी इथे कोणाची जिरवायला आलो नाही, तर आमच्या कार्यकर्त्यांना बळ द्यायला आलो आहे. मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही. मात्र, आमच्या नादाला लागलात तर सोडत नाही. सावज टप्यात आले की कार्यक्रम करतोच, असा इशारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिला. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींसह वाई. खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांमधील भाजपचे लोकनियुक्त नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या भव्य नागरी सत्कार वाई येथील गणपती आळीमधील भाजी मंडईत रविवारी (दि. 26) झाला. त्यावेळी मंत्री गोरे बोलत होते. माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी आमदार मदन भोसले, रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड, कृषिभूषण शशिकांत पिसाळ, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, डॉ. नितीन सावंत, ज्येष्ठ नेते नितीन भरगुडे-पाटील, आनंदराव शेळके, अनुप सूर्यवंशी, पाचगणीच्या नगरसेविका लक्ष्मी कर्हाडकर, प्रताप यादव, विराज शिंदे, डी. एम. बावळेकर, अमित चव्हाण, दीपक ननावरे, अॅड. दिप्ती पिसाळ, जितेंद्र पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा निवडक वापर होत असल्याची टीका केली. आपल्यावर प्रसंग आल्यावरच चव्हाणसाहेब आठवतात. मात्र, समोरच्याला त्रास देताना ते विचार कुठे जातात, असा सवाल त्यांनी केला. भाजप. माझ्याविरोधतही विरोधकांनी कटकारस्थाने केली. मंत्रिपदावर असतानाही पत्रकार परिषद व ट्रॅप प्रकरण घडवून मला अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळे तुम्ही जे पेरले, ते उगवणारच, असा इशारा देत, त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून विरोधकांवर पलटवार केला. मदन भासले म्हणाले, आमच्या पुढे अनिल सावंत उभे असले, तरी मागे दीपक ननावरेसारखा खंबीर कार्यकर्ता ताकदीने उभा आहे. हीच आमची खरी शक्ती आहे. प्रत्येकाच्या कामाचे मूल्यमापन होणार असून, जबाबदार्या वाढल्या आहेत. ही सामूहिक निष्ठेची परीक्षा आहे. यावेळी शशिकांत पिसाळ, वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत, विराज शिंदे, वैशाली भिलारे, सुशांत गोळे, दिलीप बाबर यांची भाषणे झाली. नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या हस्ते मंत्री गोरे यांचा सत्कार करण्यात आला. मंत्री गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. प्रिया शिंदे, अनिल सावंत, उपनगराध्यक्ष घनशाम चक्के, जिल्हा परिषदेचे सभापती ऋषीकेश धायगुडे, सौ. ऋतुजा शिंदे, सौ. तेजस्विनी कदम, अमित चव्हाण, सदस्य दिलीप बाबर, वाई पंचायत समिती सदस्या डॉ. सुरभी भोसले, स्वप्निल गायकवाड, सचिन भोसले, खंडाळा पंचायत समिती सदस्य अतुल पवार, पाचगणीच्या नगरसेविका लक्ष्मी कराडकर, अर्चना यादव, केतकी मोरे (पाटणे), पद्मा जाधव, अपर्णा जमदाडे, डॉ. जागृती पोरे, संग्राम सपकाळ, सचिन सावंत, विनोद बिरामणे, अभिलाषा कराडकर, नूतन मालुसरे, प्रसाद बनकर, ज्योती गांधी, दीपाली सावंत, प्रसाद कारंजकर, वैभव कराडकर, रवींद्र कुंभारदरे, पं. स. सदस्या अनिता भोईटे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तिन्ही तालुक्यांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विराज शिंदे भाजपमध्ये जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्षपदांच्या निवडीवेळी झालेल्या गोंधळानंतर ऋतुजा शिंदे यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी मोर्चा काढला होता. या पार्श्वभूमीवर शिंदे दाम्पत्य काही काळ सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिले होते. मात्र, ते भाजपच्या कार्यक्रमात एकत्र मंचावर दिसल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. यावेळी मंत्री गोरे यांच्या उपस्थितीत विराज शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.