Jayant Patil : राष्ट्रवादी शरद पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? जयंत पाटलांनी तडकाफडकी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये नाराजीचे वातावरण (Jayant Patil) असल्याच्या चर्चा अधूनमधून समोर येत असतात मात्र पक्षाकडून त्या चर्चा धुडकावल्या जातात. मात्र आता पक्षतील अंतर्गत वाद समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
जयंत पाटलांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) अंतर्गत मोठा राजकीय घडामोड घडली आहे. पक्षाचे सर्व प्रवक्ते आणि पदाधिकारी यांच्या नियुक्त्या तातडीने रद्द करण्यात आल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
कामकारण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद @NCPspeaks @PawarSpeaks @supriya_sule @Jayant_R_Patil @RRPSpeaks pic.twitter.com/gBS1xIhktm
— महेश तपासे Maehesh Tapasey (@maheshtapase) April 23, 2025
का घेण्यात आला हा निर्णय?
या निर्णयामागे पक्षातील एका वादग्रस्त विषयावरून निर्माण झालेली अंतर्गत कुरबूर असल्याचे समजते. 16 एप्रिल रोजी झालेल्या पक्षाच्या एका महत्त्वाच्या बैठकीत पानिपत येथे केंद्र सरकारकडून प्रस्तावित असलेल्या शौर्य स्मारकाला विरोध करण्याची भूमिका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मांडली. मात्र, पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी या भूमिकेला कडाडून विरोध केला. यामुळे बैठकीतले वातावरण चांगलेच तापले होते.
वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेला विरोध केल्याने महेश तपासे यांची मुख्य प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. मात्र, निर्णयाची अधिकृत घोषणा न करता सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द (Jayant Patil) करण्यात आल्या. कोणत्याही एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली असे वाटू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे.
कोण आहेत महेश तपासे?
महेश तपासे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि कार्यकर्ते आहेत. ते महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतात.





