मुंबई : उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांनी आज आपला पदभार स्विकारला आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये परत येण्याच्या आशा पुर्णपणे मावळल्या आहेत. दरम्यान, बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी गेले होते. आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी त्यांची भेट घेतली. तर आता आणखी दोन आमदार पुन्हा अजित पवार यांचे मन वळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.
आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे हे देखील अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी विधानभवनात पोहचले आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशीही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवार यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. छगन भुजबळ भुजबळ यांच्या हाती निराशा आली असली तरी पुन्हा एकदा शेवटचा प्रयत्न म्हणून जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे त्याचं मन वळविण्याचा प्रयत्न करत आहेत.
पक्षात कितीही मतभेद असुदे मात्र घर तुटू नये या विचाराने राष्ट्रवादीचे सर्वच नेते आता अजित पवारांची मनधरणी करत आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत जे आमदार राजभवनात गेले होते ते पुन्हा पक्षात परतू लागले आहेत. आता वरिष्ठांच्या समजुतीने अजित पवार यांची घर वापसी होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.