Jaya Bachchan Rajyasabha Election : समाजवादी पक्षाने (सप) मंगळवारी राज्यसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवार जाहीर केले. त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांचाही समावेश आहे. पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याने त्या राज्यसभेच्या खासदार या भूमिकेत यापुढेही दिसणार आहेत. उत्तरप्रदेशातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. त्या राज्याच्या विधानसभेतील संख्याबळ विचारात घेता १०८ आमदार असणाऱ्या सपचे ३ उमेदवार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतात. | Jaya Bachchan Rajyasabha Election ती बाब ध्यानात घेऊन सपने उमेदवार जाहीर केले. इतर उमेदवारांमध्ये माजी केंद्रीय मंत्री रामजीलाल सुमन आणि माजी आयएएस अधिकारी अलोक रंजन यांचा समावेश आहे. पक्षाने ७५ वर्षीय जया यांच्या संसदीय कामगिरीवर पुन्हा विश्वास दर्शवला आहे. | Jaya Bachchan Rajyasabha Election त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याने त्या पाचव्यांदा राज्यसभा खासदार बनण्यास सज्ज झाल्या आहेत. सपच्या तिन्ही उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्जही दाखल केले. त्यावेळी सपचे अध्यक्ष अखिलेश यादव उपस्थित होते. राज्यसभा निवडणूक २७ फेब्रुवारीला होईल.