जय शहांनी रचला इतिहास, बनले सर्वात तरुण ‘आयसीसी’ अध्यक्ष

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी इतिहास रचला आहे. ते आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत. जय शहा ग्रेग बार्कले यांची जागा घेतील. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ30 नोव्हेंबर रोजी संपणार आहे.
अलीकडे, बार्कले यांनी तिसरी टर्म घेण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत आता जय शहा(Jay Shah ICC New Chairman) यांची ICC चे नवीन अध्यक्ष (ICC Chairman Election) म्हणून निवड झाली आहे.
Congratulations to BCCI Honorary Secretary Mr. Jay Shah for being elected unopposed as the next Independent Chair of the International Cricket Council.@JayShah pic.twitter.com/sKZw4mdRvi
— BCCI (@BCCI) August 27, 2024
जय शहा सध्या 35 वर्षांचे –
जय शहा सध्या 35 वर्षांचे आहेत. ICC चे अध्यक्ष बनणारे ते 5 वे भारतीय आहेत. यापूर्वी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर हे आयसीसीचे अध्यक्ष राहिले आहेत. जगमोहन दालमिया यांची 1997 मध्ये प्रथम आशियाई ICC अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
शरद पवार 2010 ते 2012 पर्यंत ICC चे अध्यक्ष होते. चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सहमालक एन श्रीनिवासनही हे आयसीसीचे अध्यक्ष राहिले आहेत. 2014 ते 2015 पर्यंत त्यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाची भूमिका बजावली. शशांक मनोहर 2015 ते 2020 पर्यंत ICC चे अध्यक्ष होते.
जय शहा यांची बिनविरोध निवड –
ICC चे पुढील स्वतंत्र अध्यक्ष म्हणून जय शहा यांची बिनविरोध निवड झाली आहे. शहा यांनी ऑक्टोबर 2019 पासून बीसीसीआयचे सचिव आणि जानेवारी 2021 पासून आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. ते 1 डिसेंबर 2024 रोजी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. विद्यमान चेअरमन ग्रेग बार्कले यांनी तिसरी टर्म न घेण्याचा निर्णय घेतल्याने चेअरमनपदासाठी शहा हे एकमेव उमेदवार होते.





