Jay Pawar Emotional Post: डोळ्यातील अश्रू पुसत स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न; जय पवारांनी आईचा व्हिडिओ शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट
Jay Pawar Emotional Post: बारामतीत जनता दरबारमध्ये दादांसाठी होणारी गर्दी सुनेत्राताईंसाठीही झालेली पाहायला मिळाली.
Jay Pawar Emotional Post: अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय त्यांनी पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला.
त्यानंतर शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांच्या एका बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांना सर्वांशी संवाद साधताना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र त्या डोळे पुसून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत होत्या.
जय पवार यांची पोस्ट
जय पवार यांनी सुनेत्रा पवारांचा अजितदादांच्या आठवणीत भावुक झालेला व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवला आहे. सोबतच कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘डॅड नेहमीच आपल्या हृदयात आहेत आणि मॉम आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान आहे.’
त्यापूर्वी त्यांनी इन्स्टा स्टोरीवर अजित पवार यांचा एक व्हिडीओ शेअर करत ‘डॅड तुमच्या आठवणी नेहमीच जपून ठेवेन. मिस यू डॅड’ असे लिहिले.
सुनेत्रा पवारांचा अजितदादांसारखा कामाचा धडाका सुरू
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांनी देखील अजितदादांसारखा कामाचा धडाका सुरू केला आहे. डीपीडीसीच्या बैठका आणि काल बारामतीतला जनता दरबार देखील पुन्हा भरला होता. Jay Pawar Emotional Post
यावेळी दादांसाठी होणारी गर्दी सुनेत्राताईंसाठीही झालेली पाहायला मिळाली. सुनेत्रा पवार यांच्या या कामाच्या पद्धतीने त्याही हळूहळू दादांच्या पावलावर पाऊल टाकत असल्याचे दिसत आहे. Jay Pawar Emotional Post
हेही वाचा:






