Jawa 42 All Stars Edition : 1.85 लाखांत आली जावाची ‘All Stars’ बाइक; 14 सप्टेंबरपासून मिळणार डिलिव्हरी
Jawa 42 All Stars Edition :Jawa 42 All Stars Edition लाँच झाली असून तिची किंमत 1,84,942 रुपयांपासून आहे. बुकिंग सुरू असून 14 सप्टेंबर 2026 पासून डिलिव्हरी सुरू होणार आहे.

Jawa 42 All Stars Edition : सणासुदीच्या काळातील वाहनांच्या वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी Classic Legends ने Jawa 42 All Stars Edition बाजारात आणली आहे. या विशेष आवृत्तीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1,84,942 रुपये आहे. स्टँडर्ड मॉडेलच्या तुलनेत या बाइकची किंमत सुमारे 10 हजार रुपयांनी अधिक आहे. बाइकच्या बुकिंगला सुरुवात झाली असून, 14 सप्टेंबर 2026 पासून डिलिव्हरी सुरू होणार आहे.
Jawa 42 All Stars मध्ये प्रामुख्याने कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. बाइकला नवीन ग्राफिक्स, स्टार थीम, विशेष डिझाइन आणि ‘All Stars’ बॅजिंग देण्यात आले आहे. कंपनीने इंजिन आणि अन्य प्रमुख यांत्रिक घटकांमध्ये बदल केलेला नाही.
Jawa 42 मध्ये 294.72 सीसी, सिंगल-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड DOHC इंजिन आहे. हे इंजिन 27.1 एचपी पॉवर आणि 26.3 एनएम टॉर्क निर्माण करते. इंजिनला सहा-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. ब्रेकिंगसाठी पुढे 280 मिमी आणि मागे 240 मिमी डिस्क ब्रेक असून, ड्युअल-चॅनेल एबीएसची सुविधा आहे. बाइकचा व्हीलबेस 1,369 मिमी, तर सीटची उंची 795 मिमी आहे.
Jawa 42 All Stars च्या रंगानुसार किंमती :
All Stars Ivory – 1,84,942 रुपये
Nebula Blue – 1,86,942 रुपये
Battle Green – 1,86,942 रुपये
Moss Grey – 1,86,942 रुपये
Black – 1,89,942 रुपये
दरम्यान, कंपनीने Jawa 42 Bobber All Stars देखील सादर केली असून तिची सुरुवातीची किंमत 2,08,942 रुपये आहे. या विशेष आवृत्तीतही स्टार थीम आणि ‘All Stars’ ब्रँडिंग करण्यात आले आहे.
Jawa 42 च्या या नव्या आवृत्तीची स्पर्धा Royal Enfield Classic 350, Royal Enfield Meteor 350 आणि Honda CB350 H’ness यांसारख्या मोटारसायकलींशी आहे.


