चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळ यान उतरवणारा जपान ठरला 5वा देश ; पहाटे झालं लॅंडिंग

टोकियो – चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळ यान उतरवणारा जपान हा पाचवा देश ठरला आहे. जपानचे अंतराळ यान आज पहाटेच्या सुमारास चंद्रावर अलगद उतरले आहे, अशी माहिती जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या अधिकार् यांनी दिली. मात्र जीव पुरवठ्याच्या समस्येमुळे ही मोहिम अडचणीत येऊ शकते.
जपानने अंतराळात सोडलेले मानवविरहीत अंतराळ यान योग्य ठिकाणी उतरले आहे का नाही, याची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी आणखीन काही कालावधी लागू शकतो, असे अधिकार् यांनी सांगितले. हे अंतराळ यान नियोजित ठिकाणी उतरवणे हेच या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट होते.
या अंतराळ यानातील रोव्हर उतरले असून स्मार्ट लॅन्डरच्या माध्यमातून डाटा पृथ्वीवर पाठवला जात आहे. या डाटाचा उपयोग स्मार्ट लॅन्ड इन्व्हेस्टिगेटिंग मून अर्थान स्लीमला परत पाठवला जात आहे, असे जपानची अंतराळ संशोधन संस्था इन्स्टिट्युट ऑफ स्पेस ऍन्ड ऍस्ट्रॉनॉटिकल सायन्सचे प्रमुख हितोशी कुनिनाका यांनी सांगितले.
मात्र स्लीमची सोलर बॅटरीमधून वीज निर्मिती केली होत नाही आहे. त्यामुळे ही बॅटरी आणखीन काही तासकाम करू शकते. त्यामुळे ही बॅटरी जेवढा वेळ काम करते आहे, तेवढ्या कालावधीमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावरील जास्तीत जास्त डाटा गोळा करून पृथ्वीवर पाठवण्याला प्राधान्य दिले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
जपानपूर्वी अमेरिका, सोव्हिएत रशिया, चीन आणि भारत हे देश चंंद्रावर यशस्वीपणे अंतराळ यान उतरवण्यात यशस्वी झाले आहेत. जपानच्या चांद्रमोहिमेने किमान यश मिळवले असल्याचा दावा कुनिनाका यांनी केला आहे.
स्लीम मध्यरात्रीनंतर थोड्याच वेळात म्हणजे १२.२० वाजता चद्राच्या पृष्ठभागावर उतरले. मात्र ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर त्याची स्थिती नेमकी कशी आहे, हे समजू शकत नव्हते. त्यामुळे नियंत्रण कक्षामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्.याच्या दोन तासांनी झालेल्या पत्रकार परिषदेपर्यंत कोणतीही ताजी माहिती देण्यात आली नव्हती.
नियोजित ठिकाणी उतरल्यासच यशस्वी..
नियोजित ठिकाणी स्लीम अवकाश यान उतरले असले, तरच ही मोहिम यशस्वी झाली, असे मानता येणार आहे.
नेहमी अंतराळ यान उतरण्यासाठी १० किलोमीटरचा परिसर निश्चित केलेला असतो. मात्र स्लीमसाठी केवळ १०० मीटरचा परिसर निश्चित केलेला होता. त्यामुळे ही मोहिम खूपच अवघड होती.





