2050 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे जपानचे उद्दिष्ट
Updated On:

टोकियो- 2050 पर्यंत जपान शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करेल, असे जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी म्हटले आहे. गेल्याच महिन्यात देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर क्षालेल्या संसदेच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये सुगा यांनी कार्बन उत्सर्जनाबाबतचे हे महत्वाकांक्षी उद्दिष्ट जाहीर केले.
स्थायी अर्थव्यवस्था आपल्या विकासाच्या धोरणाचा आधारस्तंभ बनविणे आणि “ग्रीन सोसायटी’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा आपला मानस आहे, असेही सुगा यांनी सांगितले. हवामान बदलाला ओझे न मानता संधी समजण्यासाठी जीवाश्म इंधनांपासून दूर जाण्याच्या गरजेवर सुगा यांनी जोर दिला. जपानच्या सध्याच्या उर्जा योजनेनुसार, त्यातील 56 टक्के उर्जा जीवाश्म इंधनांमधून मिळवली आहे.





