टोकियो – जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ते भारताच्या दौऱ्यावर प्रथमच येत आहेत. यावेळी ते पाच ट्रिलीयन येनची (42 अब्ज अमेरिकन डॉलर्स) भारतात पाच वर्षात गुंतवणूक करण्याची घोषणा कण्याची शक्यता आहे. भारत -जपान वार्षिक शिखर परिषदेत सार्वजनिक-खासगी गुंतवणूक योजना जाहीर करण्याची शक्यता असल्याचे निक्केई एशियाच्या बातमीत म्हटले आहे.
जपानी पंतप्रधानांच्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्याच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या वेळी ते भारताला 300 अब्ज येनचे कर्ज देण्याची घोषणा करण्याची शक्यता निक्केईने वर्तवली आहे. कार्बनचे वातातवणारणातील प्रमाण करण्यासाठी उर्जाक्षेत्रातील परस्पर सहकार्य करारावर स्वाक्षरी केली जाण्याची शक्यता आहे.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी 2014 मध्ये भारतात 3.5 ट्रिलीयन डॉलर्सची गुंतवणुक करण्याची घोषणा केली होती. हा विक्रम नव्या पंतप्रदानांची घोषणा मोडली जाण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरींदम बागची म्हणाले, जपानच्या पंतप्रधानांचा दोन दिवसीय दौरा आज पासून सुरू होत आहे. ते उद्या सकाळी मायदेशी रवाना होतील. दोन्ही देशांच्या पंतप्रदानांचा सहभाग असणारी शिखर परिषद साडे तीन वर्षांनी सुरू होत आहे.