जान्हवी कपूरचा कान्समधील मनमोहक लुक; चाहत्यांना आली श्रीदेवींची आठवण

Janhvi Kapoor | कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक बॉलीवूड आणि हॉलीवूडच्या कलाकारांनी हजेरी लावली. आता अभिनेत्री जान्हवी कपूरनेही कान्समध्ये शानदार पदार्पण केले आहे. जान्हवीसोबत ईशान खट्टर आणि विशाल जेठवा देखील रेड कार्पेटवर दिसून आले. जान्हवीच्या ‘होमबाउंड’ या चित्रपटाचं कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर होणार आहे.
यावेळी जान्हवी कपूरनं कान्समध्ये तिच्या लूकनं सर्वांना प्रभावित केलं. तिनं बेबी पिंक रंगाचा ड्रेस वेअर केलेला, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. जान्हवीनं टिश्यू स्कर्टसोबत कॉर्सेट वेअर केला होता. तसेच, तिनं दुपट्टा स्टाईल करून आपलं डोकं झाकलेलं होते.
चाहत्यांना जान्हवीचा हा लूक पाहून तिची आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची आठवण आली, तर दुसरीकडे लोक जान्हवीच्या लूकचे कौतुक करत आहेत. काही चाहत्यांनी ‘जान्हवी अगदी तिच्या आई श्रीदेवींसारखी दिसत आहे,’ असे म्हंटले आहे. Janhvi Kapoor |
‘होमबाउंड’साठी पोहोचली जान्हवी
जान्हवी नीरज घेवान दिग्दर्शित ‘होमबाउंड’ चित्रपटासाठी कान्समध्ये पोहोचली आहे. यावेळी ‘होमबाउंड’ चित्रपटातील इतर कलाकार ईशान खट्टर आणि विशाल जेठवा हे देखील कान्समध्ये दिसले. तसेच चित्रपट निर्माते करण जोहर यांनीही कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली. येथील अनेक छायाचित्रे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. Janhvi Kapoor |
हेही वाचा :
हाफिज सईदचा साथीदार आमिर हमजाचा शेवट जवळ ; भारतावर हल्ल्याचा रचला होता कट





