जान्हवी कपूरने नववर्षाची सुरुवात केली देवदर्शनाने, कथित बॉयफ्रेंडसोबत पोहोचली तिरुपती बालाजी मंदिरात

Janhvi Kapoor visits Tirupati temple: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर वैयक्तिक आयुष्यात आध्यात्मिक असल्याचे नेहमीच दिसून आले आहे. एखादा नवीन चित्रपट असो अथवा विशेष दिवस, अभिनेत्री अनेकदा देवदर्शनासाठी मंदिरात गेल्याचे पाहायला मिळते. जान्हवीने वर्ष 2025 ची सुरुवात देखील देवदर्शनासह केली.
जान्हवी नववर्षाच्या सुरुवातीलाच कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडिया आणि त्याच्या कुटुंबासोबत आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात देवदर्शनासाठी पोहोचली. मंदिरात जाऊन तिने भगवान व्यंकटेश्वरांचे दर्शन घेतले. तिच्या प्रवासाचे काही फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
#WATCH | Andhra Pradesh | Actress Janhvi Kapoor visited Tirumala Sri Venkateswara Temple, today. pic.twitter.com/CWBwugMbp8
— ANI (@ANI) January 4, 2025
देवदर्शनादरम्यान जान्हवी आणि शिखर दोघांनीही पारंपारिक पोशाख परिधान केला होता. जान्हवीने गडद जांभळ्या रंगाची साडी असा पारंपारिक पोशाख परिधान केला होता. तर शिखरने पांढरे धोतर नेसले आहे. दोघेही दाक्षिणात्य पोशाखात सुंदर दिसत आहेत. जान्हवीसोबत फोटो काढण्यासाठी मंदिरात प्रचंड गर्दी झाल्याचेही पाहायला मिळाले.
View this post on Instagram
दरम्यान, जान्हवीच्या कामाबद्दल सांगायचे तर ती काही महिन्यापूर्वी रिलीज झालेल्या ‘देवरा पार्ट-1’ या चित्रपटात ज्युनिअर एनटीआरसोबत झळकली होती. लवकरच तिचा नवीन चित्रपट ‘परमसुंदरी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





