जान्हवी कपूरच्या बहिणीने शेअर केले बोल्ड फोटो, लवकरच ‘या’ चित्रपटातून करणार बॉलिवूड डेब्यू

मुंबई – अभिनेत्री जान्हवी कपूरला कोण ओळखत नाही. चित्रपट असो वा फॅशन जान्हवी आपल्या स्टाइलमुळे खूप प्रसिद्ध आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला जान्हवीच्या बहिणीबद्दल सांगणार आहोत. जान्हवी इतकीच तिची बहीण ख़ुशी देखील सुंदर आहे. अभिनय क्षेत्रात नसली तरी खुशीची सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलविंग आहे.
जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूरने नुकतेच तिचे काही सेल्फी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या सेल्फीमध्ये खुशीची स्टाइल खूपच बोल्ड दिसते. फोटोमध्ये खुशीने मेकअपसोबतच डीप नेक टॉप घातला आहे. केस क्लिपने बांधलेले आहेत. या फोटोमध्ये खुशी काही शूटसाठी तयार होत असल्याचे दिसत आहे. फॅन्सला खुशीने फोटोद्वारे दिलेले हे उपडेट चांगलेच आवडले आहेत. म्हणूनच अनेकांनी तिच्यावर कॅमेंटचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
झोया अख्तरच्या ‘आर्चीज’ या चित्रपटात खुशी कपूर दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग अजून सुरू झालेले नाही. पण या चित्रपटात झोया अख्तर खुशी व्यतिरिक्त इतर अनेक स्टार किड्स लाँच करणार आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आर्चिज चित्रपटात दिसणार आहे. एवढेच नाही तर अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाही त्यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.





