बॉलीवूडमधील पॉप्युलर स्टार डॉटर्सपैकी एक असलेली अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडिओज् चाहत्यांशी शेअर करत आहे.
जान्हवीने नुकतेच रेट्रो लुकमधील शेअर केलेले फोटो खूपच व्हायरल झाले आहेत. जान्हवीने वेगवेगळया साडयांमध्ये केलेले हे फोटोशूट चाहत्यांना आवडले असून तिच्या लुकचे सर्वत्र कौतुक होत आहे.
View this post on Instagram
Diwali is almost here! And @bennetton_perfumes cannot be missing from my essentials! #ColorsPurple
फोटो शेअर करत जान्हवीने लिहिले की, “1950मधील लुकला साजेशा प्रयत्न केला आहे. तोही एका दिवसासाठी करताना खूप आनंद मिळाला.’ या फोटोशूटवर बॉलीवूडमधील अनेक सेलेब्सनेही कॉमेंट केल्या आहेत.
यापूर्वी जान्हवी कपूरने डिझायनर मनीष मल्होत्रासोबत फोटोशूट केले होते. हेवी ज्वेलरीमधील मेंहदीने रंगलेल्या हातांमध्ये “धडक’ फेम जान्हवी कपूरचा अंदाज पाहण्यासारखाच होता.
View this post on Instagram
Dream it, then go for it! 😊 What do you dream about? @benetton_perfumes #UnitedDreamsTogether
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास जान्हवी कपूर अखेरच्या वेळी “गुंजन सक्सेना ः द कारगिल गर्ल’मध्ये झळकली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले होते.
जान्हवी कपूर लवकरच “किटी’ चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय “दोस्ताना-2′ आणि “तख्त’ चित्रपटातही ती भूमिका साकारत आहे.