जनता कर्फ्यू : काय करावे आणि काय करू नये

पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला 22 मार्च रोजी म्हणजेच रविवारी “जनता कर्फ्यू’चे आवाहन केले आहे. जेणेकरून आपण सामाजिक अंतर निर्माण करू शकू. यामुळे करोना विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखता येईल. या दिवशी प्रत्येकांनी आपल्या घरीच राहावे. पण याबाबत लोकांच्या मनात काही प्रश्न उपस्थित होत की “जनता कर्फ्यू’ कसा पाळायचा. यासंबंधित काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेवू.
1. घरी रहा, बाहेर पडू नका
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्वांनी घरातच राहावे आणि बाहेर पडू नये. तसेच सोसायटीच्या आवारात किंवा उद्यानातही जाऊ नये. नागरिक एकमेकांच्या संपर्कात येवू नये, यासाठीच मोदी सरकारने “जनता कर्फ्यू’चे आवाहन केले आहे. हा “जनता कर्फ्यू’ सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत चालेल.
2. केव्हा बाहेर पडावे?
शक्यतो, घराबाहेर न पडण्याचा प्रयत्न करावा. परंतु जर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असेल तर आपण घर सोडावे. उपचारासाठी बाहेर पडणाऱ्यांना रोखू नये. तसेच आपण जवळच्या दुध, ब्रेडच्या दुकानात जावू शकता. कारण या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. यासाठी कोणालाही थांबवू नये.
3. घरातून कोण बाहेर पडू शकता.
पोलीस, मीडिया, डॉक्टर आणि स्वच्छत कामगारच घराबाहेर पडू शकतात. कारण त्यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनीही या लोकांना बाहेर पडणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. कारण त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.
4. सायंकाळी 4.00 वा. टाळी, थाली किंवा घंटी वाजवावी
पंतप्रधानांनी सर्व देशवासीयांना विशेष विनंती आहे की ते संध्याकाळी 4.00 वा. आपल्या खिडक्या आणि दाराजवळ उभे राहून डॉक्टर, पोलीस, मीडिया कर्मचारी, सफाई कामगार, होम डिलिव्हरीच्या लोकांचे 5 मिनिटांसाठी आभार मानावे. यासाठी आपण टाळी, थाली किंवा घंटी वाजवू शकता. यासाठी सायंकाळी पाच वाजता सायरनच्या माध्यमातून लोकांना माहिती देण्याचेही त्यांनी आवाहन केले.
5. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हात धुवून राहणे
भलेही आपण सर्वजण घरात असला आणि कुठेही बाहेर जाणार नाही. परंतु दर 20 मिनिटांनी किमान 20 सेकंद हात धुवावेत. तसेच शौचास जाण्यापूर्वी आणि नंतर आपले हात धुतलेले असले तरी हात धुवा.





