नायगाव-राजुरी (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जनाबाई काळूराम भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपसरपंच सचिन भगत यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच उद्धव भगत यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी जनाबाई भगत यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया ग्रामसेवक काशीपती सुतार यांनी पार पडली. यावेळी पुरंदर पंचायत समितीच्या माजी सभापती रत्नप्रभा भगत यांच्या हस्ते जनाबाई भगत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योगपती कृष्णाजी भगत, अंकुश भगत, सदस्य विपुल भगत, सुरेखा घारे, मीना शिवरकर, रंजना भगत, मनोहर भगत, संतोष भगत, दिलीप भगत, युवा कार्यकर्ते अनिल भगत आदी उपस्थित होते.