Jammu Kashmir stun Maharashtra in SMAT 2025 : सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात महाराष्ट्राला दुबळ्या जम्मू काश्मीर संघाने पराभवाचा धक्का दिला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या महाराष्ट्राच्या संघाला १३० रोखल्यानंतर १३१ धावांचे लक्ष्य कश्मीरच्या संघाने १८.४ षटकांत ५ गडी राखून गाठले. अशा प्रकारे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वाखाली तगड्या संघाला सलामीच्या सामन्यातच पराभव पत्करावा लागला आहे, ईडन गार्डनच्या मैदानावर जम्मू कश्मीर संघाने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राच्या संघाला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. महाराष्ट्राच्या एकाही फलंदाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही. महाराष्ट्राचा संपूर्ण संघ १९.५ षटकात १३० धावांवर सर्वबाद झाला. महाराष्ट्राकडून विकी ओस्तवालने सर्वाधिक २५ चेंडुत २१ धावांची खेळी केली. इक्बाल आणि खजुरिया यांंची ४८ धावांची सलामी – जम्मू कश्मीरकडून औकीब नबीने ३ , युधवीर सिंग, आबिद मुश्ताक आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी २ तर मुरुगन अश्विनने एक गडी बाद केला. कामरान इक्बाल आणि शुभम खजुरिया यांनी ४८ धावांची सलामी भागीदारी करत काश्मीरच्या संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. सलीमीवीर फलंदाज बाद झाल्यानंतर विव्रत शर्मा आणि मुसैफ एजाज यांना लवकर बाद करत महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. हेही वाचा – Commonwealth Games 2030 : भारताला 15 वर्षांनंतर ‘राष्ट्रकुल’चे यजमानपद! ‘या’ शहरात पार पडणार संपूर्ण स्पर्धा परंतु आबिद मुश्ताकने दमदार फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. अशा प्रकारे जम्मू-कश्मीरने १८.४ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्य गाठले. कश्मीरकडून कामरान इक्बालने सर्वाधिक २८ धावांची खेळी केली तर महाराष्ट्राकडुन राजवर्धन हंगरगेकर आणि प्रशांत सोळंकी यांनी प्रत्येक २ गडी बाद केले.