नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (CRPF) एक अधिकारी शहीद झाला. विनोद कुमार असे शहीद झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील गंगू भागात पहाटे अडीच वाजता दहशतवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफ टीमवर गोळीबार सुरू केला. या गोळीबारात सीआरपीएफचे एएसआय विनोद कुमार जखमी झाले होते.
त्यानंतर त्यांना पुलवामा येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान मंगळवारीच जम्मू-काश्मीर पोलिस दलात तैनात एएसआय मुश्ताक अहमद हे देखील दहशतवाद्यांच्या चेक पोस्टवर झालेल्या हल्ल्यात शहीद झाले होते. या घटनेत अन्य दोन जवानही जखमी झाले आहेत.