Jamkhed News : नागेश्वर क्रिकेट संघातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; खेळाडूंनी घेतला निरामय आरोग्याचा वसा
'निरोगी शरीर आणि सुदृढ मन हाच यशस्वी आयुष्याचा पाया आहे,' हा संदेश देत जामखेड येथील नामांकित नागेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने आज आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात (Jamkhed News) साजरा करण्यात आला.

Jamkhed News : ‘निरोगी शरीर आणि सुदृढ मन हाच यशस्वी आयुष्याचा पाया आहे,’ हा संदेश देत जामखेड येथील नामांकित नागेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने आज आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात (Jamkhed News) साजरा करण्यात आला.
मैदानावर केवळ क्रिकेटचे चौकार-षटकारच नाही, तर आरोग्याची उत्तम इनिंग खेळण्यासाठी योग साधना तितकीच महत्त्वाची आहे, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित सर्व खेळाडू आणि मान्यवरांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा केली. धावपळीच्या युगात मानसिक शांतता लाभण्यासाठी आणि खेळाडूंमधील (Jamkhed News) एकाग्रता व शारीरिक लवचिकता वाढवण्यासाठी योग कसा फायदेशीर ठरतो, यावर याप्रसंगी चर्चा करण्यात आली.
या आरोग्यदायी उपक्रमाला क्रीडा क्षेत्रातील आणि स्थानिक पातळीवरील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. यामध्ये: विकास जाधव, सुनील कुलकर्णी, डॉ. निखिल वारे, गणेश रुपनर, लोकेश विश्वकर्मा, शाहरुख शेख, अनिल सानप.दिग्विजय तावरे, मनोज आंधळे, शुभम राळेभात, आकाश मोहोळकर, अजय कोल्हे, आदित्य अंदुरे तात्यासाहेब जरे, कृष्णा आजबे, विशाल पवार, रवी चराटे, अमर खेत्रे, शंतनु परदेशी, सचिन निमोणकर आणि अथर्व परदेशी आदी उपस्थित होते.
यावेळी विकास जाधव यांनी सांगितले की क्रिकेट असो वा इतर कोणताही खेळ, शारीरिक तंदुरुस्तीसोबतच मानसिक संतुलन राखणे अत्यंत गरजेचे असते. योग आपल्याला ती ऊर्जा देतो. नागेश्वर क्रिकेट संघाने केवळ खेळापुरते मर्यादित न राहता सामाजिक आणि आरोग्याचा संदेश देणारा हा उपक्रम राबवला, ही कौतुकास्पद बाब आहे.
नागेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात या स्तुत्य उपक्रमाचे जामखेड (Jamkhed News) परिसरातील क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. सर्वांनी दररोज किमान २० मिनिटे योगासने करण्याचा संकल्प करत कार्यक्रमाची सांगता केली.






