जामखेड : खर्ड्याची प्रतिक्षा भुते उपजिल्हाधिकारीपदी
Updated On:

जामखेड (प्रतिनिधी) : उपजिल्हाधिकारीपदी प्रतीक्षा भुते हिची निवड झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत तिने यश मिळवले. प्रतीक्षा ही जामखेड तालुक्यातील खर्ड्याची रहिवासी आहे. उच्च माध्यमिक व अभियांत्रिकी शिक्षण नगरमध्ये झाले.
कॅम्पस् इंटरव्ह्यूमध्ये निवड होऊनही ते नाकारून तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत यश मिळवले. ती सध्या नायब तहसीलदार म्हणून सांगली येथे कार्यरत आहे. याबद्दल तिचे तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, वडील पोपट भुते, मनोज दळवी, प्रा. विजय पवार यांनी अभिनंदन केले.





