अजित पवाराकडुन पुन्हा जामखेड लक्ष :युवती प्रदेश अध्यक्षा संध्या सोनवणे यांची विधानसभा निवडणुकीसाठी ‘स्टार प्रचारक’ म्हणून नियुक्ती

जामखेड । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा कर्जत जामखेड लक्ष केंद्रित करत नुकतेच युवती प्रदेश अध्यक्षा म्हणून निवड केलेल्या संध्या सोनवणे यांची ‘स्टार प्रचारक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आ रोहित पवार यांना अजित पवारांकडून शह देण्यासाठी रणनीती आखली जात आहे असे बोलले जात आहे.
दरम्यान पक्षाच्या विचारधारेचे सशक्त प्रतिनिधित्व करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांच्या सशक्तीकरण आणि सामाजिक न्यायाच्या धोरणांना बळ मिळेल.
संध्या सोनवणे यांनी यापूर्वी विविध युवक आणि महिला विषयक उपक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाच्या विषयांवर कार्य केले गेले असून, त्यांचे संघटन कौशल्य आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे त्यांनी पक्षात विशेष ओळख निर्माण केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष मा.सुनील तटकरे आणि यांच्या नेतृत्वात पक्षाच्या प्रत्येक विचारसरणीला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे.
संध्या सोनवणे यांनी या विश्वासाबद्दल पक्षाचे आभार मानले असून, त्या म्हणाल्या, “माझ्यावर पक्षाने ठेवलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. पक्षाच्या विचारधारेला मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी पूर्ण समर्पणाने काम करेन आणि येत्या निवडणुकीत आमचा पक्ष नंबर एकचा पक्ष म्हणून पुढे येईल असा विश्वास व्यक्त करते.





