Jambut News : लोकनेते रामदास ढोमे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, हजारोंचा जनसमुदाय उपस्थित
पिंपरखेड (ता. शिरूर) येथील माजी सरपंच लोकनेते रामदास गणपत ढोमे यांचे शनिवारी (दि. १) रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच (Jambut News) पिंपरखेड आणि परिसरात शोककळा पसरली.

Jambut News : पिंपरखेड (ता. शिरूर) येथील माजी सरपंच लोकनेते रामदास गणपत ढोमे यांचे शनिवारी (दि. १) रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच (Jambut News) पिंपरखेड आणि परिसरात शोककळा पसरली.
त्यांच्यावर पिंपरखेड (ता. शिरुर) येथील घोडनदीकिनारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रसंगी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोचा जनसमुदाय उपस्थित होता.
पिंपरखेड गावच्या (Jambut News) सर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकासामध्ये त्यांचे कार्य उल्लेखनीय होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात पिंपरखेड येथे उपसरपंच, विविध विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पहिले होते.
गावातील विकासाबरोबर ग्रामदैवत तुकाईदेवी मंदिर उभारणी, श्रीदत्त मंदिर उभारणी, हनुमान मंदिर उभारणी आदी सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले होते.
यावेळी त्यांना (Jambut News) शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील, माजी अध्यक्ष देवदत्त निकम, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे, पंचायत समिती सदस्य संभाजी चव्हाण, डॉ. सुभाष पोकळे, भाजपचे नेते सावित्रा थोरात, शरदचंद्र पतसंस्थेचे अध्यक्ष एम. डी. घंगाळे, बाळकृष्ण कड, माजी सरपंच दामू घोडे, वैभव उंडे यांचेसह परिसरातील विविध गावतील संस्थाचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी श्रद्धांजली वाहिली.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. प्रसिद्ध सिनेअभिनेते हेमंत ढोमे यांचे ते चुलते तर सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त दयानंद ढोमे यांचे ते चुलत बंधू होते.






