“सर्व मुस्लीम प्रभू रामाचेच वंशज, राम-कृष्णाला न मानणारे खरे मुस्लिम नाहीत”; भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

Jamal Siddiqui on Sanatan Dharma। भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी एक खळबळजनक दावा करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी असा दावा केला की,”सनातन धर्म इस्लामपूर्वीचा आहे आणि भारतीय मुस्लिम हे भगवान रामाचे वंशज आहेत.” त्यांच्या या दाव्यावर आता दावे -प्रतिदावे करण्यात येत आहेत.
एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत, सिद्दीकी यांनी सर्व मुस्लीम हे प्रभू श्रीरामाचे वंशज असल्याचं विधान भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक संघटनेचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावरून सध्या चर्चा चालू असून त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जमाल सिद्दिकी यांनी मुस्लीम धर्माचं मूळ, हिंदू देवी-देवतांचं मुस्लीम प्रथांमधील स्थान आणि भारतात राहणाऱ्या विविध समुदायांचा एकमेकांमध्ये गुंफलेला वारसा यासंदर्भातदेखील जमाल सिद्दिकी यांनी यावेळी भूमिका मांडली.
काय म्हणाले जमाल सिद्दिकी? Jamal Siddiqui on Sanatan Dharma।
सनातन धर्म हा इस्लमा धर्माच्याही खूप आधी अस्तित्वात आला, तो मानवी संस्कृतीचा पाया आहे, असे मोठे विधान जमाल सिद्दिकींनी केलं. “सनातन धर्म इस्लामच्या खूप आधी अस्तित्वात आला. ज्या मुस्लिमांचा राम किंवा कृष्ण यांच्यावर विश्वास नाही, त्यांना मुस्लीम म्हणताच येणार नाही”, असे वादग्रस्त विधान सिद्दिकी यांनी इस्लाममध्ये अनेक प्रेषितांचा उल्लेख करण्यात आल्याचा दावा केला.
VIDEO | On 11 years of Modi government, BJP Minority Front National President Jamal Siddiqui says, “On the completion of 11 years of Prime Minister Narendra Modi’s government, we will go among the minority communities to discuss and review the remarkable work done by the Prime… pic.twitter.com/tQxq343ztw
— Press Trust of India (@PTI_News) May 29, 2025
पुढे बोलताना त्यांनी “कुराणमध्ये २५ प्रेषितांचा उल्लेख आहे. पण हदीथ आणि इस्लामिक परंपरांनुसार जगभरात १ लाख २५ हजार प्रेषित पाठवण्यात आले होते. मग आपण असं कसं म्हणू शकतो की प्रभू श्रीराम व प्रभू कृष्ण हे त्यांच्यापैकीच एक नव्हते? ते इश्वराचेच दूत होते”, असेही जमाल सिद्दिकी यांनी यावेळी म्हटले आहे. याशिवाय, “सर्व मुस्लीम हे प्रभू श्रीरामाचेच वंशज आहेत”, असा दावा देखील त्यांनी केला आहे.
“प्रार्थनेची पद्धत बदलली असली, तरी…”
दरम्यान, हिंदू व मुस्लीम धर्मीयांची प्रार्थनेची पद्धत बदलली असली, तरी संस्कृती एकच असल्याचेही सिद्दिकी म्हणाले. “दोन्ही धर्मातील लोकांची प्रार्थना करण्याची पद्धत जरी वेगळी असली, तरी मूळ संस्कृती एकच आहे. आपली ओळख अजूनही सनातनी अशीच आहे”, असे विधान सिद्दिकी यांनी केले आहे. सिद्दिकी यांच्या या विधानावर आता चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या दाव्यांवर दावे-प्रतिदावे केले जात असून त्यासंदर्भात भाजपाकडून अद्याप अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नाही.
मोदींच्या यशावर चर्चा करणार Jamal Siddiqui on Sanatan Dharma।
दरम्यान, मोदी सरकारने सत्तेत ११ वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर जमाल सिद्दिकी यांनी पीटीआयला प्रतिक्रिया दिली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही अल्पसंख्याक समुदायांमध्ये जाऊन मोदींनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीवर चर्चा करणार आहोत. मोदी सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा लाभ घेण्यात अल्पसंख्याक समुदायाला काही अडचणी येत आहेत का? याचाही आढावा आम्ही घेऊ. आम्ही लोकांच्या भेटीगाठी घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू, प्रश्न विचारू आणि त्यांना खात्री देऊ की हे सरकार त्यांचं सरकार आहे”, असं जमाल सिद्दिकी म्हणाले आहेत.





