पुणे जिल्हा | देवकर वस्ती शाळेत ‘जल्लोष उत्सव

वडापुरी, (वार्ताहर) – इंदापूर तालुक्यातील बाभुळगांव येथील जिल्हा परिषदेच्या देवकर वस्ती शाळेत पहिले वार्षिक स्नेहसंमेलन ‘जल्लोष उत्सव’ साजरा करण्यात आला. शालेय शिक्षण समितीच्या वतीने पोपट उंबरे, पोपट गुरगुडे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यमान सरपंच रेश्मा गुरगुडे, माजी सरपंच सुनिता देवकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
वस्ती शाळेत पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची पट संख्या ४५ इतकी आहे. या सर्वच विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी बालगीतांपासून ते वारकरी संप्रदायातील अभंग, भारुड, वासुदेव, गवळणी, विविध विषयांवरील भाषणे तसेच नव्या-जुन्या हिंदी- मराठी चित्रपटांतील गाण्यांवर नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले.
तर समाज प्रबोधनपर नाटक, सहसी क्रीडा प्रकारातील दही हंडी तसेच मल्लखांब प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी मुख्याध्यापक सचिन गुरव यांनी प्रस्ताविक केले. गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात, विस्ताराधिकारी रुईकर, केंद्रप्रमुख हनुमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम राबवित आहोत.
यावेळी बाभुळगांव येथील ग्रामस्थांच्या वतीने वस्ती शाळेचे मुख्याध्यापक सचिन गुरव, सहशिक्षिका अश्विनी हेगडे, अंगणवाडी शिक्षिका सुजाता भोसले यांच्या उत्कृष्ट कार्यकर्तूत्वाचा गौरव केला.
यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष धनाजी देवकर, ग्रामपंचायत सदस्य नागनाथ गुरगुडे, ग्रामपंचायतीचू माजी सदस्य संतोष लोंढे, सामाजिक कार्यकर्ते संजय देवकर, अभिजित पाटील, आदर्श शिक्षक अशोक टिपाले, नजीर शिकलगार यांसह अनेक मान्यवर तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.





