घरात बसा नाहीतर भरचौकात उठाबशा काढा,जळगावमध्ये विनाकरण फिरणाऱ्यांसाठी एकच शिक्षा
Updated On:

जळगाव- करोना’चे युद्ध जिंकण्यासाठी केंद्र सरकार, राज्यसरकार, स्थानिक प्रशासन उपाययोना करीत आहे. तरीही जनता ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारे (दि. 23) राज्यात संचारबंदीचे आदेश दिले. तरीही जळगावमधील काही महाभाग या बंदीचे उल्लंघन करून घरी बसण्याऐवजी घरात बसून काय करणार? असे म्हणत सर्रासपणे दुचाकी, चारचाकींमधून फिरत आहे.
या महाभागांना पोलिसांनी आडवत ‘प्रसाद’ देत छपत्री शिवाजी महाराज चौकात (कोर्ट चौक) उठाबशांची शिक्षा दिली. त्यामुळे ‘करोना’चे युद्ध जिंकण्यासाठी किमान काही दिवस घरात बसा व आपण भारताचे सच्चे नाकरीक आहोत हे दाखवून द्या, असे आवाहन दैनिक ‘प्रभात’द्वारे आपणास करण्यात येत आहे. अत्यावश्यक गरज असेल तरच बाहेर निघा अन्यथा घरात बसा अन् ‘करोना’चेन ब्रेक करा, अशी कळकळीची विनंती आहे.





