Jalgaon’s Prestigious Ganpati Idols: जळगाव मनपाच्या मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक उत्साहात
Jalgaon's Prestigious Ganpati Idols:
Updated On:

Jalgaon’s Prestigious Ganpati Idols: जळगाव महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीची श्री विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात निघाली आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.
यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नगरसेवक मोठ्या संख्येने विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. ढोल-ताशांचा गजर आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मिरवणुकीत उत्साहाचा रंग भरला.
यावेळी महापौर दीपमाला काळे यांनी ढोल-ताशांच्या गजरात फुगडी खेळत मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. दरम्यान, शेतकऱ्यांवरील दुष्काळाचे संकट दूर होऊ दे, अशी प्रार्थना करत महापौर दीपमाला काळे यांनी गणरायाच्या चरणी साकडे घातले.


