जळगाव जिल्हा बँक निवडणूक : रोहिणी खडसे-खेवलकर विजयी, तर 11 जागा बिनविरोध
Updated On:

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महिला गटातून महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलतर्फे विद्यमान अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी अपेक्षेनुसार विजय मिळविला असून, दुसर्यांदा जिल्हा बँकेत एंट्री केली आहे.
मतमोजणीत रोहिणी खडसे-खेवलकर यांना तब्बल २२०० चा लीड मिळाला असून त्यांचा विजय निश्चीत आहे. त्या लागोपाठ दुसर्यांदा जिल्हा बँकेत संचालक म्हणून दाखल झाल्या आहेत.
जळगाव मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ११ जागा आधीच बिनविरोध झाल्या. यात महिला गटातून आघाडीच्या सहकार पॅनलतर्फे विद्यमान अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर आणि छायादेवी दिलीपराव निकम यांना उमेदवारी मिळाली. या जागा बिनविरोध करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मात्र याला यश आलं नाही. अखेरीस रोहिणी खडसे यांचा विजय झाला.

