जळगावात भीषण अपघात: दूध टँकर आणि ट्रकमध्ये जोरदार धडक, 5 जणांचा जागीच मृत्यू

जळगाव – काल पुण्यातील 5 जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना ताची असतानाच आज जळगाव जिल्ह्यात भीषण अपघात होऊन 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव जवळ शुक्रवारी आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
या अपघातासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावपासून 2 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री धुळ्याहून दूध घेऊन चाललेला टँकर बंद पडल्यामुळे दुसरा टॅंकरमध्ये क्रेनच्या सहाय्याने दूध ओतण्याचे काम सुरु होते. रस्त्यावर अंधार असल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना हा टॅंकर दिसला नाही त्यामुळे भरधाव वेगाने टाईल्सने भरलेल्या ट्रक त्या पाठोपाठ 2 कारने अशा 4 ते 5 भरधाव वाहनांने दोन्ही महामार्गावर उभ्या टँकर्स आणि क्रेनला धडक दिली. यामध्ये टँकरमधील 3 जण, टँकरचा धुळ्यावरून आलेला मालक आणि अजून 1 जण अशा 5 जणांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मुक्ताईनगर पोलिस, घोडसगाव येथील पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी धाव घेतली. अद्यापपर्यंत मृतांची नावे कळू शककेली नाहीत. पुढील तपास पोलीस करत आहेत.





