Sanjay Raut : महावीर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मुंबईतल्या जैन समुदायाच्या कार्यक्रमात जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केलेल्या एका विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई, छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी द्वितीय यांच्या आई महाराणी ताराराणी भोसले या जैन समाजाच्या असल्याचे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. Sanjay Raut या विधानावरुन नवा वाद निर्माण झाला असून, उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत ( sanjya Raut) यांनी कठोर शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत निषेध व्यक्त केला आहे. काय सुरू आहे महाराष्ट्रात? शिवरायांचे राज्य इतके नपुसंक का झाले आहे? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर सांगतात की महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! औरंगजेबाशी झुंज देणाऱ्या वीरांगना ताराराणींचे धर्मांतर करण्याचा अधिकार याना दिला कोणी? ताराराणी शिवरायांचे… pic.twitter.com/UaNX3BzKus — Sanjay Raut (@rautsanjay61) April 1, 2026 जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी ऐतिहासिक संदर्भ देताना समाजावर कसा अन्याय झाला याबद्दल बोलतो ते होते. ते म्हणाले,“औरंगजेबाचा नाश जैन मुनी नेमकं काय म्हणाले? Sanjay Raut करण्यासाठी जैन महाराणी असलेल्या ताराराणींचा जन्म झाला.” जैन मुनींच्या या विधानाचा उघडपणे अनेकांनी विरोध केला आहे. त्यानंतर आता काय सुरू आहे महाराष्ट्रात? असे म्हणत काही सवाल संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्वीट करत विचारले आहेत. “राज्याचे उपमुख्यमंत्री जे स्वतःला मराठा समजतात त्यांच्या उपस्थितीत महाराणी ताराराणी यांचा वंश बदलण्याचा प्रयत्न केला गेला. या विधानाचा साध निषेध देखील त्यांनी व्यक्त केला नाही.” “महाराणी ताराराणी या राजाराम महारांच्या पत्नी, हंबीरराव मोहिते त्यांच्या कन्या मग हंबीरराव मोहिते जैन होते का?” असा सवाल राऊतांनी विचारला आहे. राज्य सरकारला त्यांनी केलेल्या धर्मांतर कायद्याची आठवणही राऊतांनी करुन दिली आहे. Sanjay Raut : जैन मुन्नी आचार्य नयन पद्मसागर यांचं महाराणी ताराराणीबद्दल वादग्रस्त विधान; “राज्यात वेगळ्या पद्धतीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. तुम्हीच तर राज्यात धर्मांतर विरोधी कायदा आणला ना? मग आमच्या ताराराणीचे धर्मांतर करण्याचा अधिकार कोणी दिला यांना? यावर कारवाई केलीच पाहिजे,” अशी मागणी राऊतांनी केली आहे. “एकनाथ शिंदे यांनी सर्वात आधी निषेध व्यक्त करायला पाहिजे होता. त्यांना कदाचित ताराराणी माहिती नसेल, त्यांना कदाचित ताराबेन ऐकले असेल. फडणवीसांना वाटत नाही ताराराणीचा अपमान झाला आहे? फडणवीसांना, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि जरांगे पाटील यांना वाटतं नाही का हा ताराराणी यांचा अपमान आहे?” असेही संजय राऊत म्हणाले आहेत. हेही वाचा : LPG Gas Price Hike : अखेर तेच घडलं ! व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९५ रुपयांची वाढ ; घरगुती सिलिंडरविषयी काय परिस्थिती?