Pune District : जयदीप बारभाई यांचे करोना काळात उत्कृष्ट कार्य; जेजुरीतील गावकऱ्यांची प्रतिक्रिया : सर्व घटकांना न्याय

पुणे : करोना महामारीत संपूर्ण देशात हाहाकार उडाला होता. त्यावेळी जेजुरी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते जयदीप दिलीपभाई बारभाई यांनी सर्व सामान्य घटकांना आधार दिला होता. त्यावेळी जयदीप बारभाई यांनी सुविधा दिल्याने सर्वांना आधार मिळाला होता. तो आधार आम्ही कधीही विसरू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली.
जेजुरी शहरात करोना काळात गोरगरीब, कष्टकरी, वंचित लोकांना दैनंदिन रोजीरोटीसाठी रोजगारचा प्रश्न निर्माण झाला होता. आर्थिक टंचाई निर्माण झाली होती. गोरगरिबांचे प्रपंच चालविण्यावर मर्यादा निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे दिलीपदादा बारभाई मित्र परिवाराच्या वतीने दहा हजार पाचशे नागरिकांना करोना कालावधीमध्ये अन्नधान्याच्या किटच्या माध्यमातून दोन वेळा वाटप करण्यात आले. यामध्ये दिलीपदादा बारभाई परिवाराने कोणतीही जात-पात धर्म भाषा प्रांत याकडे न पाहता सर्व माझे जेजुरकर आपलाच आहे, या उदात्त भावनेने संपूर्ण जेजुरी शहरांमधील लोकांना त्या ठिकाणी करोनाच्या काळामध्ये धान्य वाटप करण्यात आले. गरजू लोकांना आर्थिक मदत केली होती.
जेजुरी शहरातील सर्व शासकीय इमारती, रुग्णालय शहरातील परीसरात सनिटायझिंग करण्यात आले. जनतेच्या हितासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी जेजुरी शहरात चिकुनगुनिया आजाराची साथ निर्माण झाली होती. कित्येक दिवस चिकुनगुनिया आजाराने नागरिक त्रस्त होते. काही नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने उपचार घेऊ शकत नव्हते. त्यावेळी लोकांना औषधोपचार करण्यासाठी मोफत इंजेक्शन आणि औषध गोळ्यांचे वाटप करण्यात आले. जेजुरीकर नागरिकांसाठी दिलीपदादा बारभाई परीवार एकप्रकारे देवदूत म्हणून धावून आले. शहरातील प्रत्येक नागरिकांना आपलेसे वाटावे, असे कार्य दिलीप दादाभाई मित्रपरिवारच्या वतीने केले जात आहे. हाच आम्हा सर्वसामान्य घटकांचा आधार आहे, अशी प्रतिक्रिया सर्व सामान्य नागरिक, महिलांनी दिली.
जनतेच्या पाठिशी ठाम उभा राहणे हेच कर्तव्य
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप दिलीपभाई बारभाई म्हणाले, जेजुरी शहरातील सर्वसामन्य लोक हेच माझे संचित आहे. त्यांनाअडीअडचणीच्या काळात मदत करणे माझे कर्तव्य समजतो. आतापर्यंत मित्र परिवार जनतेच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे. अडचणीच्या काळातील सेवेमुळे जनता निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसचे पाठीमागे राहिल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. जेजुरी शहरातील मतदार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व २१ उमेदवारांच्या पाठिशी राहतील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.





