जय आणि माहीची मुलगी रुग्णालयात दाखल; पोस्ट शेअर करत दिली माहिती

मुंबई – टीव्ही अभिनेता जय भानुशाली आणि माही विज सोशल मीडियावर सक्रिय असतात. अनेकदा ते त्यांची लेक तारासोबतचे रिल्स सोशल मीडियावर शेअर करत असतात. ताराचे खोडकर व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत असतात. मात्र अनेकांची आवडती अवघ्या 4 वर्षांची तारा रुग्णालयात दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. ताराला इन्फ्लूएंझा ए फ्लूची लागण झाली आहे.
माहीने इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. माहीने तारासोबतच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात माही ताराचे केस विंचारताने दिसते. ही पोस्ट शेअर करत माहीने लिहिले की, ‘जेव्हा ताराला ताप आला तेव्हा माहीला तो फार गंभीर वाटला नाही. मात्र नंतर माही आणि तिची फॅमिली खुपच घाबरली. जेव्हा रात्री ताराला ताप भरला तेव्हा मी डॉक्टरांशी चर्चा करून तिला औषधे देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा परिणाम तारावर झाला नाही. तिला ताप 104 पेक्षा जास्त ताप होता. माहीने तिला रात्री थंड पाण्याच्या पट्ट्याही लावायल्या.’
याच पोस्टमध्ये माहीने पुढे लिहिले की, ‘शुक्रवारी सकाळी ताराला घेऊन ती हॉस्पिटलमध्ये गेली. डॉक्टरांनी तिच्या काही टेस्ट केल्या आणि तिला इन्फ्लूएंझा ए फ्लूची लागण झाल्याचे त्यांनी सांगितले. या आजाराबाबत सांगताना माही म्हणते, हा श्वसनाशी संबधित सर्वात विषाणूजन्य संसर्ग आहे. त्यात खूप ताप, अंगदुखी, खोकला आणि इतर लक्षणे असतात. बहुतेक मुले एका आठवड्यात फ्लूपासून बरे होतात, परंतु काही मुले अधिक गंभीर होतात आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे ताराला आम्ही रुग्णालयात दाखल केले.’
View this post on Instagram
यानंतर तिने ताराच्या तब्येतीबाबतही माहिती दिली आहे. आता तारा बरी होत असून आज तिचा रुग्णालयातील चौथा दिवस आहे. लवकरच तिला डिस्चार्ज मिळणार असल्याचे माहीने सांगितले आहे. माहीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ताराची काळजी घेण्याचे अनेक चाहत्यांनी म्हंटले आहे.





