दिल्लीतील जगजीवनराम हॉस्पीटल सील
Updated On:

नवी दिल्ली : दिल्लीतील जगजीवनराम हॉस्पीटल मधील डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी अशा एकूण 44 जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने हे रूग्णालयच आता सील करण्यात आले आहे. दिल्लीत गेल्या 24 तासात सील करण्यात आलेले हे दुसरे रूग्णालय आहे.
जगजीवनराम हॉस्पीटल आता पुर्णपणे सॅनिटाईज केले जात आहे. तेथे जे रूग्ण भरती आहेत त्यांना तेथेच ठेऊन ही उपाययोजना केली जात आहे. या रूग्णांखेरीज आता तेथे बाहेरील कोणत्याही रूग्णांना भरती करण्यास अनुमती नाकारण्यात आली आहे. या आधी दिल्लीतील हिंदुराव हॉस्पीटल सील करण्यात आले आहे. उत्तर दिल्लीतील हे सर्वात मोठे हॉस्पिटल आहे. दरम्यान दिल्लीतील एकूण करोनाग्रस्तांची संख्या आता 2625 इतकी झाली आहे.





