तब्बल 35 वर्षांनंतर सापडली आई ! पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गेला आणि..

नवी दिल्ली – एखाद्या जत्रेत किंवा मेळ्यात आईपासून मुलांची ताटातूट होते आणि ते काही वर्षांनी पुन्हा एकदा एकमेकांना भेटतात. अशी स्टोरी अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये पाहायला मिळते. मात्र असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. तब्बल ३५ वर्षानंतर माय लेकाची भेट झाली आहे.पंजाबमध्ये हा प्रकार घडला असून तब्बल ३५ वर्षानंतर आईला भेटताच या युक्तीने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सर्व प्रकाराची माहिती दिली.
जगजीत सिंग हा सहा महिन्यांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्याच्या आईने दुसरे लग्न केले म्हणून जगजीतला त्याच्या आजी आजोबांनी स्वतःकडे ठेवले. जगजीत थोडा मोठा होताच आजी आजोबांनी त्याला तुझे आई वडील लहानपणीच वारले असल्याचं खोत सांगितलं.
पंजाबमध्ये सध्या सर्वत्र पूरस्थिती आहे. अशात पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जगजीत कादियान, गुरुदासपूर येथील धर्मपुरा परिसरातील पूरग्रस्तांच्या सेवेसाठी ‘खालसा एड’ संस्थेच्या वतीने पटियाला येथे गेले होते. याच दरम्यान त्याला त्याच्या मावशीचा फोन आला आणि तिने तुझ्या आईचे पेरेंट्स म्हणजेच आजोळचे तुझे आजी आजोबा पटियालयातील असल्याचे सांगितले.
यानंतर जगजीतने माहिती घेत तात्काळ बोहदपूर गाठले आणि तपास करत नानिहालचे त्यांचे घर शोधले. तेथे त्यांची भेट आजी प्रीतम कौर यांच्याशी झाली. त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी हरजीत कौर हिचे लग्न कर्नाल येथे झाले होते, पण तिच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. त्यांना सोनू नावाचा मुलगाही होता. त्याने आजीला आपण सोनू असल्याचे सांगितले.
या सर्व प्रकारानंतर जगजीत आपल्या आईला भेटला आणि त्याने आईला घट्ट मिठी मारली. यावेळी दोघेही एकमेकांना पाहून भावून झाले होते. जगजीतने यानंतर आपली पत्नी आणि मुलांना देखील आईला भेटवले.पुराच्या निमित्ताने का होईना जगजीत दुसऱ्या ठिकाणी गेला आणि त्याला त्याची आई मिळाल्याने संपूर्ण कुटुंबियांना आनंद झाला.
जगजीत सांगतात की, लहानपणापासूनच त्यांना सांगण्यात आले होते की त्याचे आई-वडील एका अपघातात मरण पावले, त्यानंतर त्याचे पालन-पोषण त्याच्या आजी-आजोबांनी एक वर्षापासून केले. आजोबा हरियाणा पोलिसात काम करायचे. तेथून निवृत्त झाल्यावर ते कादियानमध्ये येऊन स्थायिक झाले.



